विजय रात्रीच्या वेळी निघाला होता. गाव अजून दूर होते. झपाझप झपाझप पाऊले पडत होती ... जणू काही जमिनीवरून नुकताच कात टाकलेला साप जात होता. किर्र रात्र, आवाज केल्याशिवाय ऐकू येणार नव्हता अशी वेळ. कदाचित याचीच भीती पाउलांना होती म्हणून मध्ये मध्ये पाला पाचोळा उडवून साथीचा दिलासा स्वतालाच देत होती. विजयाला काही सुचत नव्हते, कुणी तरी त्याचा पाठलाग करत aahe असे त्याला निघाल्या पासून वाटत होते. मागे वळून बघायची भीती वाटत होती, म्हणून शबनम मध्ये असलेला आरसा मध्ये मध्ये समोर घेऊन मागे कुणी आहे का हे बघायचा.
एवढ्या कडकाच्या थंडीत पण त्याला घाम घाम फुटला. मनाच्या कल्पनेची शक्ती शरीराच्या शक्ती पेक्षा कैक पतीने जास्त असल्याचा हाच एक पुरावा होता. तो जितका जोरात चालत होता तितकेच मन मात्र गावी पोचून कधी एकदा शरीर येते आणि ते झोपते असे झाले होते. वेळ पुढे जात होती, पाला पाचोळा पण साथ देई नासा झाला. पावला मध्ये आता मातीची ढेकळ लागत होती आणि फुटत होती. क्षण भर त्याला फाटत आहेय का फुटत आहे हेच कला नव्हते. त्याचा वेग यामुळे मंदावला. कधी पासून तो याच संधीची वाट बघत होता. विजयाला एका आवाजाचा भास झाला. त्याने आरसा उचलला आणि प्रयत्न केला मागे काही आहे का बघण्याचा..... आरशात बघितले तर मागे त्याला ओलसर काही तरी दिसले. त्याला धडकीच भरली. रडावेसे वाटत होते पण, वय आणि विजन शांतता ते होऊ देत नव्हते. त्याने रुमाल काढला आणि चेरा पुसला. आता मात्र आरशात स्पष्ट मागचे दिसायला लागले. मागे तेव्हा तरी काहीच नव्हते. रुमाल मात्र ओलाचिंब झाला होता. ढेकळ पण संपली होती. पुन्हा एकदा त्याला वेग सापडला.
============================================
Vijay Albal