अपेक्षा
-----------------------------------------------------------------------------
असतील जगात अनेक प्राणी , मानव कोणी तर पक्षी कोणी
नाना स्वभाव , नाना भावना , नाना चिंता , नाना कामना
असला कुठलाही समाजस्तर , त्याचा लाभ होईस्तोवर
आपले स्थान त्याच्या मस्तकावर , अक्कल येते घसरल्यावर
अनेक शिक्षा , अनेक कक्षा , सर्व ठायी किंतु अपेक्षा
मोडता ती सलते शिक्षा , वाटते नसती ठेवली अपेक्षा त्यापेक्षा
अपेक्षेवरती असे आयुष्यचक्र ,
तत्पूर्तीसाठी कोणी लडिवाळ, तर कोणी वक्र
पाल्याच्या पालकाकडून, नोकराच्या मालकाकडून ,
थोर बसले अपेक्षा ठेवून, गेले जीवन मात्र सडून
देवकृपेने अवतरला बालक
तेच मूळ अपेक्षा ठेवती पालक
होईल माझा बाल्य आज्ञाधारी
जीवन इमारत अपेक्षा पायरी
मी वाढविला , मी शिकविला
मी पाळला , मी सांभाळला
मी खर्च केला , मी जगविला
मी पोसला , मी सोसला
माझे मन , त्याचे जीवन
आता काळ माझा जवळ
आला का अपेक्षापुर्तीचा काळ ?
हे पाल्या तूच पोस , तूच सांभाळ
तुटती स्वप्ने , ठरे अपेक्षा खोटी
पाल्य झाला कठोर , का मोडली का काठी ?
होता होता मी गेलो शाळेच्या दारात
रोज वदे नवी अपेक्षा घरात
प्रेम , ममतेच्या तर कधी अश्रूंच्या भरात
रडता रडता निघे अपेक्षांची बारात
मग महाविद्यालयात , तर कधी नोकरीत
आयुष्यात प्रत्येक पायरीत
अपेक्षाभंगाचे ओझे सावरीत
गेलो पुढे पुढे मी ऎटीत
म्हणून वियोग म्हणे व्हा खंबीर
हे वीरा धर जरा धीर
सोडूनी अपेक्षेचा पक्ष
कर स्वप्रवृत्ती निर्मळ निरपेक्ष
~vijay
Vijay one of the Gem from u.
ReplyDeleteWe are waiting for new ones.........
करा स्वप्रवृत्ती निर्मळ निरपेक्ष...एकदम बरोबर !
ReplyDelete