Monday, August 9, 2010

सॉफ्ट्वेअर इंजिनीयर चे लाईफ़.............

सॉफ्ट्वेअर इंजिनीयर चे लाईफ़.............
------------------------------------------------------------------------------

मन म्हणते ऊठ ऊठ... झाला जिम चा टाईम
शरीर म्हणते त्रास देऊन... करु नकोस क्राईम
मग मी देतो मनाला, अजून ५ मिनिटांचे ब्राईब
मन म्हणते ओके , मग तू का केलेस जिम सब्स्क्राईब

काय करु दिवसगणिक वाढतेय माझे फॅट
काम नही , खुर्चीत बसून करतो फक्त चॅट
खावून खावून वाढलीय पोटाची ही गॅलरी
खाण्याआधीच दिसतात खाण्यातल्या कॅलरी

एकदाच झाला क्लायंटचा तो कंन्फ्रन्स कॉल
मग चालू होतात पिच्चर्स, तुडवला जातो मॉल
होत मग सोमरसाचा कधी लार्ज आणि कधी स्मॉल
त्यामुळे होतो गोंधळ... दिसते म्हातारी पण डॉल

हे असेच आहे सॉफ्ट्वेअर इंजिनीयर चे लाईफ़
फरक नाही पडत, आली जरी वाईफ
हे लाईफ़ म्हंजे बिस्कीट , पैसा त्यातले क्रिम
पण सर्वै सन्तु सुखिन: हेच आमचे ड्रिम

~वियोग

4 comments:

  1. Vijay..this poem was written before your marriage.
    Do you still believe फरक नाही पडत, आली जरी वाईफ ??? :)

    ReplyDelete
  2. ८-१० तास सलग निर्जीव कॉम्प्युटरशी खेळल्यानंतर दुसरे काय होणार... बाहेरचे अमर्याद जग पाहण्याची आणि त्याला निर्भीडपणे सामोरे जाण्याची वृत्ती अंगी आणायला हवी!

    ReplyDelete