Wednesday, July 21, 2010

महाभारत

       आपण जेव्हा परीक्षा देत असतोतेव्हा आपल्याला सांगितले जाते कि अमुक अमुक पुस्तकातील प्रश्न येतीलकाही जन तर इतके ठाम असतात कि विचारायची सोय नाहीते म्हणतात या पुस्तकाच्या बाहेरचे काहीच नाही जगात. असाच मी एकदा शांत बसलो होतो. मी शांत बसलो होतो म्हणजे मी खूप व्यस्त होतो. गोंधळून जाऊ नका, मी बरेचदा नाशवंत जगापासून बाहेर फेरफटका मारून येतो.  मनासारखे एकाच जागी बसून फिरून येण्यासारखे वाहन नाही. मला तर प्रश्न पडतो कि हि देव लोक कशाला उंदीर, मोर, वाघ, सिंह घेऊन फिरतात.

       तो दिवस रविवारचा होता, मी निवांत बसलो होतो. डोळ्यासमोरून काही दिवसात येणारी वादळी परीक्षा दिसत होती. परीक्षा म्हंटली कि माझे डोळे अंधुक होतात आणि पंख्याचा वारा पण वादळासमान भासतो. जे होणार आहे ते माहित असल्यामुले मी अभ्यास करायच्या फंदात पडत नाही. पण पुढे बसणार्याशी मैत्री मात्र जमवतो. असे शांत बसता बसता झोपेने  कधी मिठी मारली कळलीच नाही. मी तिच्या मिठीत गारद होणार तेवढ्यात एक आजोबा आले नि म्हणाले 'बाला  अरे पलंगावर वर जाऊन जोप ? नाही तर अवघडून जाशील'. हे म्हणजे सिगरेट पिताना कोणी तरी व्हिस्की ऑफर केल्यासारखे वाटले. पण माझ्यातला अभ्यासू अजून जिवंत होता आणि महत्वाचे म्हणजे जागा पण होता. मी म्हणालो 'अहो आबा परीक्षा आहे. काही कळत नाही म्हणून डोळा लागला बाकी काही नाही'. आबा म्हणाले 'ठीक आहे' आणि जाताना एक पुणेरी पिंक टाकली 'आज कालची मुले म्हणजे रडकीच आहेत. या जगात महाभारताच्या बाहेर काही नाही, कधी कळणार यांना ?'

      मी ताडकन उठलो आणि काही बोलणार तेवढ्यात विचार केला एवढा वयस्कर माणूस जर काही तरी बोलला असेल तर काही तरी नक्कीच तथ्य असेल. मग मी आमच्या माडीवरच्या खोलीत गेलो, हळूच लाबकत लाबकात जणू एखद्या बोक्यासारखा. त्या तिथे बरेच वर्षे धूळ खात बसलेली पुस्तके पडलेली. मी फुंकर मारली आणि एकाच धुराळा  उडाला जणू माझ्या   मनावरील धूळ होती कि काय असे वाटले.  मी ठरवले महाभारत वाचून काढायचे. माझे मन नुसत्या विचारांनीच रोमांचित झाले. दिवस-रात्र, दुपार-संध्याकाळ मी वाचण्याचा सपाटा लावला आणि जणू काही पिसातल्या सारखे ते संपवून टाकले. रोज काही तास मी ध्यान करू लागलो. मनात, जनात, आहारात, विचारात एकाच विचार एकाच गोस्त शोधू लागलो या जगात एक तरी गोष्ट अशी असेल जी महाभारत्च्या महाकाव्यात बसणार नाही. शेवटी दमलो आणि ज्या दिवशी मी हा शोध थांबवला त्या दिवशी मला पहिल्यांदा एका अनामिक शांततेचा साक्षात्कार झाला.

      रात्रीचे वाजले होते मला लागलेली आध्यात्मिक झोप झाली आणि एका सीरिअल चा आवाज ऐकू आला 'या गोजिरवाण्या घरात'. मी स्वताशीच हसलो आणि पाहू लागलो तर चक्क त्या मध्ये सुद्धा कोणी तरी श्रीकृष्ण बनून शामराव नामक माणसाला उपदेश होते. मला सर्वकडे महाभारत दिसू लागलो. माझ्या वागणुकी पासून ते अगदी परवाच्या 'नटरंग' मधील गुणा पर्यंत सगळ्या महाभारताच्या संबंधित व्यक्ती रेखा दिसू लागल्यामी शांतपणे विचार करत गेलो आणि एक गूढ लक्षात आले.  ब्रह्मांड जर अक्षरी रूपात अवतरले तर त्यालाच महाभारत म्हणत असावेत

      अरे एक माणूस दाखवा जो महाभारताच्या चौकटीत नाही बसत असा ? आणि त्याचे सार आपल्याला गीते मध्ये दिसतेचत्यामुळे सर्व संतांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला आणि त्यावर आधारित सूत्रे सोपी करून आपल्याला सांगितलीहे सगळे सांगण्या मागचे प्रयोजन एवढेच कि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा 'महाभारत' वाचा, रुजवा. एवढे ज्ञान दुसऱ्या कुठल्याही पुस्तकात नाही.                     

थोर ती भगवद्गीता .....थोर ते महाभारत आणि थोर ते व्यास ज्यांचा परीघ आपल्या कक्षेत नाही  !!!!!

~विजय

No comments:

Post a Comment