Tuesday, July 20, 2010

प्रभाव


बरेचदा मला हा प्रश्न पडतो कि प्रभाव आणि अभाव किती महत्वाचे असतात ?

गम्मत म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्रभाव हा मानसिक असतो  तर अभाव हा वास्तव असतो. असे का बरे ? आता उदारणार्थ माझ्या वर प्र.के.अत्रे यांचा प्रभाव आहे. असे आपण म्हणतो. पण माझ्या कडे जागेचा अथवा वेळेचा अभाव आहे. हे असे मला तरी दुतोंडी वाटते. या दोन्ही गोष्टी खूप परस्परविरोधी आहेत असे नाही का जाणवत तुम्हाला. आपण एखाद्याच्या प्रभावाखाली असतो, आपले विचार हे कोणाकडून तर प्रेरित असतात आणि म्हणून ते प्रभावी ठरतात. हा झाला व्यावहारिक दृष्टीकोन. आपल्याकडे जागा नाही, आपल्याकडे वेळ नाही, आपण काही तरी घडवू शकत नाही हा झाला माझ्यातला अभाव. अरे वा असे असते का कुठे ?

तर माझे उत्तर आहे 'हो असते'. या ठिकाणी कोणी असे नाही म्हणून शकत जे घडते चांगले ते मी केले आणि ते वाईट घडते त्याला आपला आवडता मित्र 'नशीब' जबाबदार. प्रभाव कसा होईल याचा विचार आपण कधी करू नये. कारण नाही तर आयुष्याच्या चौकटीत सकारात्मक दृष्टिकोनाचा अभाव निर्माण होईल. प्रभाव असा मागून मिळत नाही तर त्या प्रभावाची एक ताकद आपोआप आपल्यावर जादू करते आणि आपण संमोहित झाल्यासारखे त्या प्रमाणे वागू लागतो.

आता मी नेहमी म्हणायचो मी बरे लिहू शकतो म्हणून पण प्रयत्न कधीच नव्हता. परंतु माझ्या वर असलेल्या माझ्या मित्राच्या प्रभावाने मला लिहावयास भाग पडले. मी माझ्या मित्राची उशिरा लिहावयास लागल्याची क्षमा मागून आज माझ्या लेखनाला सुरवात करतो. आज कालच्या संगणकीय विश्वासात हे मी किती सहजतेने प्राप्त करू शकतो या बद्दल मी दैवाचे आभार मानून हे जाहीर करतो मी श्रीगणेशा करतोय.

आपला सदा आभारी,

विजय

4 comments:

  1. लई भारी भावा! :) येउ द्यात!

    ReplyDelete
  2. LAIII PRABHAVIII KUTLYAHI ABHAVA SHIVAI.....

    ReplyDelete
  3. फारच प्रभावी लेखन आहे विजयचे...अशीच सृजनशीलता कायम राहू दे

    ReplyDelete