चाल - वद जावू कुणाला शरण (संगीत सौभद्र )
(विडंबन)
वडा देवू कुणाला गरम आता,
करी जो शमन भूकेल्याचे ...मी भरीन पोट तयाचे,
अग वडे काढ ये , अग वडे काढ ये
जे कर जोडूनी मज पुढे, मागती वडे ... ग्राहक ते,
फुकटची खावू पाहे, अग वडे काढ ये
असे तेलही उकळे, मनातले ... मला हे कळे
जिभल्या चाटून लाळ गळे, अग वडे काढ ये
असा ठेचा हा भरला, सांडला ...थोडा बाहेरही आला ,
नाक पुसुनी हा हा ओरडला, अग वडे काढ ये
तोंड हे असे पेटले, जिभेचे चोचले ...सगळे झाले,
पोट भरे तरी तो बोले, अग वडे काढ ये
एक नंबर मजा हि आली, भूक मिटली ...तासांची हि,
दक्षिणा आम्हास हि पावली, अग वडे काढ ये
वियोग
नाट्यगीतांचा तुट'वडा' आपण संपुष्टात आणला आहे अशी माझी खात्री आहे. :)
ReplyDeletejabardast!!!! atee uttam!!!
ReplyDeletefar divasannee ek mast vidamban. (kee 'vaDaamban'?)(Pushkaraj)
एक नंबर मजा हि आली, भूक मिटली...आता वडे खाताना हे विडंबन नक्की आठवेल!
ReplyDelete