Tuesday, December 7, 2010

नकोत नुसत्या भिंती

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
घरपण नसेल जर तिथे तर नका सांगू किमती

तुमचे एक हास्य नि काळजी, भरून येते आम्हा
असेच लाख लाभो आयुष्य भर तुम्हा

कर्ता पुरुष त्याचे खांब, आईबाबांचा असे गाभा आत,
सून भरे प्रेम त्यात, कुटुंब पूर्ण होते जेव्हा असते कुणी नात

मिटती साऱ्या चिंता, शमती वेदना जेव्हा पडते पाउल घरी,
दुग्धशर्करा योग असेल तेव्हा मिळाले जर गुणी शेजारी

आमचे हे अहो भाग्य लाभले असे सासर
दृष्ट काढुनी घ्या जेव्हा मिळेल तुम्हा अवसर .....
  ~Vijay

1 comment:

  1. वाह वाह काय मस्त कविता आहे...सही विजय :)

    ReplyDelete