चितळे
कधी कधी ऑफिसमध्ये दुपारी वाटते वेगळे,
त्या पेक्षा झोपावे बनुनी चितळे,
धंदा गेला खडय्यात झोपेला महत्व,
1 ते 4 घोरुनी टिकवावे सत्त्व
मस्त पोट भरून डुलकी ती येणार,
मी नाही म्हणतो तरी थोडीच ती जाणार
चुकून गेलो मी झोपून तर होईल कल्ला,
माझ्या पोटायेवढा असणारा होईल मुडदुशी गल्ला
तुम्ही कोण सांगणार, पेक्षा आपले झोपलेलेच बरे,
आमचा धंदा बरा नि आम्ही त्यातच सुखी बरे
1 ते 4 मध्ये आता , नका मागू काहीच काका,
अस्सल आहे चितळे हा, नाही कुठलीच शाखा
~वियोग
1 number re mitra...
ReplyDelete