ओल्या आठ्वणी
--------------------------------------------
किती वाटते ते रम्य
बसूनी स्वःताहाच्या घरात
कष्टाने आणि नशीबाने
पडले सगळे पदरात
लुटतो आहे त्याची
सध्या मी खूप मजा
बघितली झोपडी, गरीबी
वाटते मला सजा
आज आहे घरात एसी, टीवी,
छोटासा एक बार
जेवण स्वःताचे करताना
होतात कष्ट फ़ार
एका फोन वर येतो
घरी मस्त तो पिझ्झा
बसल्या ठिकाणी खायला
मिळण्यात आहे मज्जा
मस्त बसूनी मी २०व्या मजल्यावर
देतो सिगारेटचे झुरके
बघता तिथून भवतालीचे जग
आठवतात ते हुंदके
पावसात कधी तेथून पाहतो
हतबल झालेली झोडपे
कळते तेव्हा असे जगणे
नसते मुळीच सोपे
वाटे मग पाऊस तेव्हाही पडायचा
आणि आजही कोसळतो
स्पर्श जरी मला नसेल करत
आजही तसाच खेळवतो
घुसूनी पाणी व्ह्यायची
तेव्हा ओली घराची धरणी
आता मात्र फ़क्त तरारते
या नयनी आठवणींचे पाणी
यायचा मग घेऊन कडेवर
माझा तो कष्टाळू पिता
पदराचा करायची छप्पर
माझी भोळीशी माता
दोघे जागे रहायचे
रात्रभर बिचारे
का कुणा साठी माझे
मन मला विचारे
त्यांच्या संगतीत
सुरक्षितता होती
संसार फ़ाटका होता
पण प्रत्येक क्षणी सोबत होती
आज माझ्या संगती
नाही कुठलीच नाती
मनात फ़क्त पावसाच्या
जुन्या आठवणी कोसळती
-Vijay
Wednesday, August 18, 2010
Tuesday, August 17, 2010
अपेक्षा
अपेक्षा
-----------------------------------------------------------------------------
असतील जगात अनेक प्राणी , मानव कोणी तर पक्षी कोणी
नाना स्वभाव , नाना भावना , नाना चिंता , नाना कामना
असला कुठलाही समाजस्तर , त्याचा लाभ होईस्तोवर
आपले स्थान त्याच्या मस्तकावर , अक्कल येते घसरल्यावर
अनेक शिक्षा , अनेक कक्षा , सर्व ठायी किंतु अपेक्षा
मोडता ती सलते शिक्षा , वाटते नसती ठेवली अपेक्षा त्यापेक्षा
अपेक्षेवरती असे आयुष्यचक्र ,
तत्पूर्तीसाठी कोणी लडिवाळ, तर कोणी वक्र
पाल्याच्या पालकाकडून, नोकराच्या मालकाकडून ,
थोर बसले अपेक्षा ठेवून, गेले जीवन मात्र सडून
देवकृपेने अवतरला बालक
तेच मूळ अपेक्षा ठेवती पालक
होईल माझा बाल्य आज्ञाधारी
जीवन इमारत अपेक्षा पायरी
मी वाढविला , मी शिकविला
मी पाळला , मी सांभाळला
मी खर्च केला , मी जगविला
मी पोसला , मी सोसला
माझे मन , त्याचे जीवन
आता काळ माझा जवळ
आला का अपेक्षापुर्तीचा काळ ?
हे पाल्या तूच पोस , तूच सांभाळ
तुटती स्वप्ने , ठरे अपेक्षा खोटी
पाल्य झाला कठोर , का मोडली का काठी ?
होता होता मी गेलो शाळेच्या दारात
रोज वदे नवी अपेक्षा घरात
प्रेम , ममतेच्या तर कधी अश्रूंच्या भरात
रडता रडता निघे अपेक्षांची बारात
मग महाविद्यालयात , तर कधी नोकरीत
आयुष्यात प्रत्येक पायरीत
अपेक्षाभंगाचे ओझे सावरीत
गेलो पुढे पुढे मी ऎटीत
म्हणून वियोग म्हणे व्हा खंबीर
हे वीरा धर जरा धीर
सोडूनी अपेक्षेचा पक्ष
कर स्वप्रवृत्ती निर्मळ निरपेक्ष
~vijay
Monday, August 9, 2010
सॉफ्ट्वेअर इंजिनीयर चे लाईफ़.............
सॉफ्ट्वेअर इंजिनीयर चे लाईफ़.............
------------------------------------------------------------------------------
मन म्हणते ऊठ ऊठ... झाला जिम चा टाईम
शरीर म्हणते त्रास देऊन... करु नकोस क्राईम
मग मी देतो मनाला, अजून ५ मिनिटांचे ब्राईब
मन म्हणते ओके , मग तू का केलेस जिम सब्स्क्राईब
काय करु दिवसगणिक वाढतेय माझे फॅट
काम नही , खुर्चीत बसून करतो फक्त चॅट
खावून खावून वाढलीय पोटाची ही गॅलरी
खाण्याआधीच दिसतात खाण्यातल्या कॅलरी
एकदाच झाला क्लायंटचा तो कंन्फ्रन्स कॉल
मग चालू होतात पिच्चर्स, तुडवला जातो मॉल
होत मग सोमरसाचा कधी लार्ज आणि कधी स्मॉल
त्यामुळे होतो गोंधळ... दिसते म्हातारी पण डॉल
हे असेच आहे सॉफ्ट्वेअर इंजिनीयर चे लाईफ़
फरक नाही पडत, आली जरी वाईफ
हे लाईफ़ म्हंजे बिस्कीट , पैसा त्यातले क्रिम
पण सर्वै सन्तु सुखिन: हेच आमचे ड्रिम
~वियोग
Subscribe to:
Posts (Atom)