Monday, November 22, 2010

पुढारी

पुढारी

--------------------

काय सांगू तुम्हाला आहे कोण मी ?
लहानपणापासून होती कुठेतरी कमी
जमतचं नव्ह्ते हो मला काही काम
शाळेत तर नापासांमध्ये माझे नाम


शाळेमंदी लय बोलायचे मला टाकून
उभे करायचे वर्गाबाहेर अंगठे धरून
मास्तुरया बापासमोर फटाफटा देई गाली
बाप पण काढायचा आवाज कानफटाखाली


ही नाचक्की सहन करत, सुटलो एकदाचा शाळेतून
गेलो कॉलेज मंदे पन, शिकायचे नव्ह्ते मनातून
शिकायला जरी असलो मी सो सो आणि नाजूक
घाबरून व्हायची पोरे माझ्या समोर भावूक


बनवला मी मग माझा एक छोटा गट
केली जर कुठल्या सरांनी अतिच वटवट
मग आमचा गट ,धावून जायचा खास
व्हायची माझ्यासारखी पोरे मग मेरीट मध्ये पास


एकुण सगळे बघता लावला पालकान्नी डोक्याला हाथ
त्यान्ना वाटले म्हातारपणी मिळनार नाही पोराची साथ
म्हातारा भडकला आणि बोलावले २-३ तांन्त्रिक
सगळे फोल नाही उपयोग , असू दे अंगार वा मांन्त्रिक


तेवढ्यात आमच्या गल्ली मध्ये आल्या विलेक्शन
सम्दया पोरान्नी केले माझे एक मुखाने सेलेक्शन
बापाने धरला हात आणि ओढत आणला घरात
माई आली मधी म्हण्टली एवढी एलेक्शन द्या पदरात


मग पुढे काय विचारता विलेक्शन वर विलेक्शन
सगळीकडे आपलीच व्हायची बर का सेलेक्शन
हळू हळू बाप पन म्हन्टला गड्या लै भारी
तुझ्यातले गुण नाही ओळखले चूक झाली माझी खरी


आता मी एक मोऒऒऒठा झालो आहे पुढारी
आमच्याच मास्तरला ठेवलाय आहे दफ्तरी
आणि आमच्या शाळेतील येनारे सगळे अव्वल नम्बरी
हाफिसात माझ्या कडे लावतात आज काल हजेरी


~Vijay

Thursday, November 11, 2010

वडा देवू कुणाला गरम आता .....नाट्य 'वडा' (किंवा 'वेडा') संगीत

चाल - वद जावू कुणाला शरण (संगीत सौभद्र )
(विडंबन)

वडा देवू कुणाला गरम आता,
करी जो शमन भूकेल्याचे ...मी भरीन पोट तयाचे,
अग वडे काढ ये , अग वडे काढ ये

जे कर जोडूनी मज पुढे, मागती वडे ... ग्राहक ते,
फुकटची खावू पाहे, अग वडे काढ ये

असे तेलही उकळे, मनातले ... मला हे कळे
जिभल्या चाटून लाळ गळे, अग वडे काढ ये

असा ठेचा हा भरला, सांडला ...थोडा बाहेरही आला ,
नाक पुसुनी हा हा ओरडला, अग वडे काढ ये

तोंड हे असे पेटले, जिभेचे चोचले ...सगळे झाले,
पोट भरे तरी तो बोले, अग वडे काढ ये

एक नंबर मजा हि आली, भूक मिटली ...तासांची हि,
दक्षिणा आम्हास हि पावली, अग वडे काढ ये

वियोग

Wednesday, November 10, 2010

दुपारची झोप

दुपारची झोप

-----------------------------------------------------------------------

येता तू घरी एका टळटळीत उन्हात
काहीश्या आवाजात सांगून गेलीस कानात
तू ओरडलीस " अरे मला उकडत आहे "
मी म्हणालो " थांब जरा फ़ॅन लावत आहे "


लावल्यावर फ़ॅन तू म्हणालीस ' हुश्श ' अशी
८ मजले जिन्याने चढून आली कशीबशी
मी म्हण्टले " आता तरी होईल तुझे वजन कमी "
तु म्हणेस " जास्त आवाज नको आधी दे तुझ्या पोटावरील टायरची हमी ? "


आता मी काय करणार तिच्या अश्या बोलण्यावर
बहुथा वाढतं वय दिसत असावे पोटावर
विचार आला हा मनात आणि गेले अचानक लाईट
आणि परत सुरु झाली आम्हा दोघांची फ़ाईट


लढता लढता दमलो आम्ही दोघे
कोणी तयारच नव्हते हटायला मागे
अचानक तिने माझ्या कानफ़टात लगावलेली होती
भानावर आल्यावर लक्षात आले संध्याकाळ झाली होती


उठलो ताडकन आणि बघतो तर ती
ऒ कोण होती ती, ती तर माझी झोप होती
बघतो तर "सी यु ऍट नाईट !!" म्हणत
माझी झोप चालली होती


~Vijay Albal