भिंती
------------------------------------------------------------------
भिंती भिंती भिंती भिंती
अहो किती झाल्या आहेत यांच्या किंमती
आम्ही पण निघालो जमवून हिंमती
विचार करता यातल्या, दिसतात मला गंमती
कुणी म्हणा ऑफ़िस, कुणी म्हणा घर
बदलते व्याखा, बदलल्या भिंती जर
म्हणती लोक असतात, भिंतींना पण कान
काही जण घालती पुजा, भिंतींना देऊन मान
असल्या भोवती जर भिंती
तर वाटत नाही कुणाची भिती
जगाची काहीही असो गती
भिंती मध्ये पण घडतात, गोष्टी या किती
दवाखाना, तुरुंग, दुकान प्रत्येक भिंतीचा वेगळा स्पर्श
ओळखीची दिसता भिंत, होतो मात्र परमहर्ष
अश्या या भिंती, राहोत सदा आपुल्या भोवती
यांच्या शिवाय जीवनी, नाही शांती नाही प्रगती
Vijay